जिल्हा संलग्नता करताना असेच एकदा एका महाशयांना भेटल्यावर उमागलेली कविता.
मी कवयित्री अजिबात नाही,पण मनात आलेल्या विचारांना लेखणीने वाचा फोडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
" मोठेपणा "
'मोठ्या' लोकांना कसं 'मोठं' होता येत?
हा प्रश्न पडायचा अनेकदा.
त्यामुळे ठरवलं आपण याचा शोध घ्यावा एकदा.
मनात एकच हलकल्लोळ सुरु असायचा सारखा.
कसं काय जमतय बरं यांना?
पुन्हा प्रश्न पडला की आपणही प्रयत्न करून पहावा का?
म्हणजे आपल्यालाही जमेल का मोठं व्हायला?
मोठं होण्याच्या या धडपडीत लागलीच ना आणखी प्रश्न पडायला.
नेमकं काय असत 'मोठं' होण तरी?
'मोठेपण' म्हणजे -
कुणासाठी 'प्रतिष्ठा' , कुणासाठी 'अधिकार'.
कुणासाठी 'संपत्ती' तर कुणासाठी 'समाधान'.
एवढ्यावर थोडेच थांबलेत हो प्रश्न.
पुन्हा प्रश्न -
या जगात कशाला बरं म्हणावी 'प्रतिष्ठा' आणि नेमके कसलेे 'अधिकार'?
कशाला समजावी 'संपत्ती' आणि कशाचे बरे 'समाधान'?
या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध तर घ्यायचाच होता.
कारण मनी तर सारखा ध्यास हा होताच.
हळूहळू कोडे उलगडत जाईल अस वाटत होत.
पण नेमकं उत्तर केव्हा मिळेल हे समजत नव्हतं.
'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' ही म्हण ऐकुण होतेच.
त्याची प्रचीती कालांतराने येऊ लागली ना.
मग उमगलं 'मोठं होणं' हेहीे व्यक्ती परत्वे बदलत जातं.
त्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारे 'मोठं व्हायचंय' हे आपलं आपणच ठरवायचं.
एवढ्यावर कुठे थांबणार आयुष्य -
'पदावर' येऊन आता या प्रश्नाचं उत्तर शोधायचा उपक्रम सुरु झालाय.
एक मात्र नक्की की पुढील आयुष्यातही अनेक प्रश्न पडतच जातील.
उत्तर कसं आणि काय आणायचंय यातच आपल्यातला 'माणूसपण' बाहेर येईल.
हवं तर 'देवी' म्हणा , हवं तर 'अदृश्य शक्ती',
ती यासाठी आपल्याला सद्बुद्धी देत राहील....
- निलम बाफना
(परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी)
No comments:
Post a Comment