तीव्र उन्हाळा संपून पहिला पाऊस पडल्यामुळे मला अतिशय आनंद झाला , त्या दरम्यान प्रवासात असताना आजूबाजूला नांगरलेली शेतं दिसत होती आणि त्यात सुचलेली ही कविता.
सुखाचा पहिला पाऊस
रखरखत्या उन्हानंतर जो पाऊस येतो
तो सर्वाना शान्ति देऊन जातो
सर्व प्राणिमात्राना सुखावतो
वेडी मी पावसाची वाट पाहत होते
आतुर झाले होते
व्याकुळ झाले होते
आणि अचानक सरी आल्या पावसाच्या
जीवाला सुखावून गेल्यात
मीच वेडी नव्हते झाले वाट पाहत
'तो' अगदी विव्हळत होता
'तिची' तहान भागवण्यासाठी
ढसाढसा रडत राहिला,तडपत राहिला
जेव्हा सरी आल्या , त्याच्या अश्रू त एक झाल्या
'ती' जरा हसली, आनंदाने खुश झाली
पुन्हा एकदा सज्ज झाली
त्याला साथ द्यायला
वंदन करून तिच्याच पोटी कुर्हाड उपसली
तरी ती रागावली नाही
'माय' महान होती ना ती धरणी
कशी त्यावर रागावणार
तो मात्र कष्ट उपसत राहिला
तिच्या पोटी बिया पेरत राहिला
पावसाची कृपा होत राहिली
आणि ती हिरवीगार जाहली
तिच्या उरी धान्य गवसले
पुन्हा सर्वाना पोसण्यासाठी
No comments:
Post a Comment